अद्यापही सुर्याला माझा सराव नाही
अद्यापही पुरेसा हा घाव खोल नाही
येथे पिसून माझे काळीज बॅसलो मी
आता भल्याभल्यांच्या हातात डाव नाही
हे दु:ख राजवर्खी .. ते दु:ख मोरपंखी
जे जन्मजात दु:खी त्यांचा निभाव नाही
त्यांना कसे विचारू कोठे पहाट गेली
त्यांच्या पल्याड त्यांची कोठेच धाव नाही
जी काल पेटली ती वस्ती मुजोर होती
गावात सज्जनांच्या आता तणाव नाही
ओठी तुझ्या न आले अद्याप नाव माझे
अन् ओठ शोधण्याचा माझा स्वभाव नाही
17 April, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
मित्रा,
या कवितेत "अद्यापहि सुऱ्याला माझा सराव नाहि" अस हव होत तिथे सुर्य नाहि सुरा आहे
दिपस्विनि
बरोबर आहे 'सुर्याला' आसा शद्ब आहे
Post a Comment